क्षितिज संकुल चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील (बापू) जाधव यांचा शाळेतील व घरातील कुटूंबीयांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा

Admin

 

  
                      क्षितिज संकुल चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील (बापू) जाधव यांचा शाळेतील व घरातील कुटूंबीयांसोबत उत्साहात वाढदिवस  साजरा.
सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील (बापू )जाधव यांचा 51 वा वाढदिवस क्षितिज गुरुकुल मध्ये उत्साहात साजरा झाला.

                           याप्रसंगीबापूंना शुभेच्छा देण्यासाठी बापूंच्या मातोश्री त्याचबरोबर बापूंच्या अर्धांगिनी सौभाग्यवती वनिता ( काकी) जाधव बापूंचे सुपुत्र शिवराज जाधव भैय्या व विश्वराज जाधव भैय्या हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम प्राचार्य पाटील मॅडम पाटील सर निवासी संकुलातील सर्व विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

निवासी संकुलातील मुलांनी बापूं विषयीच्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर श्री पवार सरांनी बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बापूंच्या  सौभाग्यवती वनिता (काकी )जाधव यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शुभेच्छा दिल्या यानंतर केक कट करण्यात आला त्याचसोबत कराओके गाण्यांच्या  कार्यक्रमाने या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अजूनच रंगत आली गाण्यांच्या कार्यक्रमानंतर संस्थापक अध्यक्षांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगत सर्वांचे आभार मानले.