क्षितिज गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षक दिनाचा आनंद

Admin

        क्षितिज गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षक दिनाचा आनंद सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी येथील निवासी संकुल व डे बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांनी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनाचे औचित्य साधून  शिक्षक दिन साजरा केला.


         सकाळपासूनच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परिपाठ व प्रार्थना घेऊन या कार्यक्रमास सुरुवात केली दुपारी दोन पर्यंत तासिका चालवल्या यानंतर औपचारिक कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनीच केले यामध्ये सूत्रसंचालन कुमारी -रचिता राजमाने व वेदिका चव्हाण या (विद्यार्थी शिक्षकानी) केले तसेच स्वागत व  प्रास्ताविक प्रबोध पाटील (विद्यार्थी शिक्षकानी) केले त्याच बरोबर काही विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जाधव सरांनी 14 सप्टेंबर रोजी असलेल्या हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक श्री सुनील (बापू) जाधव यांनी स्वीकारले याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाह वनिता (काकी) जाधव उपस्थित होत्या त्याचबरोबर मुख्याध्यापीका जाधव मॅडम प्राचार्य पाटील मॅडम पाटील सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले संकुलातील सर्व शिक्षकांचा सत्कार सन्माननीय बापूंच्या व काकींच्या हस्ते झाला व जे विद्यार्थी शिक्षक बनले होते त्या सर्वांचाही सत्कार बापू व काकींच्या हस्ते झाला त्यादिवशी सर्व दहावीतील मुलांनी सर्व गोष्टींमध्ये हिरीरीने सहभाग घेतला तसेच पृथ्वीराज साळुंखे या (विद्यार्थी शिक्षकानी) आभार  मानले व कार्यक्रम संपन्न झाला.