क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस येथे क्षितिज फेस्ट (इ.१ली ते ४थी) २०२४ चा बहारदार असा शुभारंभ करण्यात आला.

Admin



 

         क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस येथे क्षितिज फेस्ट २०२४ चा बहारदार असा शुभारंभ करण्यात आला.

                                              क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस येथे क्षितिज फेस्ट २०२४ चा बहारदार असा शुभारंभ करण्यात आला .  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते फीत कापून क्षितिज फेस्टचे  उद्घाटन करण्यात आले.प्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष,शिक्षक संघाचे सरचिटणीस अविनाश गुरव होते.


विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक गुणवत्ते इतकेच संस्कार महत्वाचे आहेत.शिक्षक,पालक व बालक यांचा त्रिवेणी संगम होऊन मुले समजून घेऊन त्याच्या व्यक्तीमत्वात योग्य वळण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुभाष कवडे यांनी केले.

 विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर एखादी कला किंवा खेळ आत्मसात करावा करून त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे असे प्रतिपादन अविनाश गुरव यांनी व्यक्त केले.नितीन सावंत म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ते बरोबरचा शारीरिक क्षमतेचा विकास होणे गरजेचे आहे.कोणतीही गोष्ट  आत्मविश्वासाने केल्यास यश निश्चित प्राप्त होईल.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्था राबवित असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.मान्यवरांचे हस्ते हस्तकला,चित्रकला,रांगोळी प्रदर्शनाचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. 



गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.लेखक रवि राजमाने,महादेव माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव,मार्गदर्शक बाळासाहेब जाधव,हजारवडीचे माजी सरपंच रणजित यादव,प्राचार्य सौ एस.आर.पाटील,आदींसह मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.दिपाली जाधव यांनी ,स्वागत विश्वराज जाधव यांनी,सूत्रसंचालन आश्र्विनी झेंडे,पूजा धनवडे यांनी केले.तर पी.आर.पाटील यांनी आभार मानले.


द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध नृत्याविष्काराने विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा झाला.