क्षितिज गुरुकुल मध्ये जिमखाना दिन हा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न

Admin

 

क्षितिज गुरुकुल मध्ये जिमखाना दिन हा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी येथे सोमवार दिनांक 5फेब्रुवारी 2024 रोजी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

निवासी संकुलाची शान असणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात सायंकाळी पाच वाजता झाली या कार्यक्रमासाठी (क्रांतिसिंह नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नातू )माननीय श्री वीरधवल वैभव नायकवडी सर (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री बाळासाहेब लालासो कटारे सर (मुख्याध्यापक श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालय ,पलूस )यांनी भूषवले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून क्रीडा ध्वज फडकवल्यानंतर संचालनातून या क्रीडा ध्वजाला सलामी देण्यात आली व कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
औपचारिक कार्यक्रमांमध्ये स्वागत प्रास्ताविक प्राचार्या सौ पाटील मॅडम यांनी केले क्रीडा प्रमुख श्री सपकाळ सर यांनी वार्षिक क्रीडा अहवाल सर्वांपुढे सादर केला स्वागत अध्यक्ष श्री सुनील (बापू )जाधव यांनी शिक्षणासोबत खेळांचे महत्त्व सुद्धा सांगितले प्रमुख पाहुणे वीरधवल नायकवडी यांनी क्षितिजमध्ये होत असलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यवाह सौ वनिता काकी जाधव यांची मोलाची उपस्थिती लाभली अध्यक्षीय भाषणानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला प्रार्थनेने सुरुवात झाली यात सूर्यनमस्कार ,लेझीम, झांज  रिबीन कवायत ,सामूहिक गाणे  कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मल्लखांब अतिशय कौशल्य पूर्ण मल्लखांब प्रात्यक्षिके निवासी मुलांनी सादर केली यानंतर नेमबाजी व आर्मी डेमो च्या प्रात्याक्षिकाने कार्यक्रमाच्या शिरपेचात तुरा खोवला.

शेवटी वंदे मातरम ने या कार्यक्रमाची सांगता झाली   या कार्यक्रमासाठी संकुलाच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम व पाटील सर यांची ही उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाची पुरेपूर तयारी अमोल सपकाळ सर, वैभव गुरव सर, विशाल गुरव सर, नागेश सर ,हिम्मत गुरव सर, कल्याणी भोळे मॅडम या सर्व क्रीडा शिक्षकांनी करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमदाडे मॅडम,  देशमुख मॅडम ,सौ भंडारे मॅडम सौ मोकाशी मॅडम ,मगदूम मॅडम झेंडे मॅडम, धनवडे मॅडम यांनी केले