क्षितिज गुरुकुल बुरुंगवाडी येथे क्षितिज फेस्ट व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

Admin

  क्षितिज गुरुकुल बुरुंगवाडी येथे क्षितिज फेस्ट व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा.

        क्षितिज गुरुकुल दिनांक 12 जानेवारी 2024 वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री प्रकाश (गरुड) पाटील (प्राचार्य अध्यापक ज्युनिअर कॉलेज तासगाव ) लाभले होते.                                                                                                 

     त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री ब्रह्मानंद पाटील माजी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक यांनी भूषविले.याप्रसंगी क्षितिज गुरुकुलचे संस्थापक श्री सुनील बापू जाधव व सौ वनिता जाधव यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष मनोगत करताना श्री सुनील बापू म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना JEE/NEET ची गरज आहे व जून महिन्यापासून अकरावी व बारावी सायन्स JEE/NEET ची सुरुवात करू अशी  ग्रामीण भागातील मुलांना ग्वाही दिली. मा. श्री गरुड सरांनी खरे पालकत्व म्हणजे  काय व त्याची गरज याविषयी माहिती सांगितली आणि क्षितिज गुरुकुल मध्ये होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले अध्यक्ष श्री ब्रह्मानंद पाटील यांनी क्षितिज संकुल व त्यांचे ऋणानुबंध यांना उजाळा दिला.

                    या कार्यक्रमातील सर्व पाहुण्यांचे स्वागत बापूंचे ज्येष्ठ सुपुत्र शिवराज जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य पाटील मॅडम यांनी केले.तसेच संकुलाच्या मुख्याध्यापिका जाधव  मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शिंदे मॅडम व व्ही एस पाटील सर यांनी केले व आभार श्री पी आर पाटील सर यांनी मांडले.

                संध्याकाळी सहा वाजता माननीय श्री रमेश हजारे सर यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले रंगमंचाचे पूजन झाल्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती केली व कार्यक्रमाची सुरुवात झाली मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार सादर केले.                  यामध्ये मराठी हिंदी गाणी कराओके गाणी, भारुड, नाटिका यांचा समावेश करून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमदाडे मॅडम व देशमुख मॅडम यांनी केले शेवटी देशभक्तीपर गाणी वंदे मातरम मध्ये या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.