क्षितिज गुरुकुलच्या गोविंदांनी केली जल्लोषात दहीहंडी साजरी

Admin


.

सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी मनोऱ्यावरती मनोरे चढवत दहीहंडी साजरी केली या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक श्री सुनील (बापू) जाधव व कार्यवाह सौ. वनिता (काकी) जाधव  यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.

त्याचबरोबर  शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम व प्राचार्य पाटील मॅडम  शाळेतील शिक्षक व बीपीएड स्टाफ उपस्थित होते दहीहंडीचे पारंपारिक रित्या पूजन करून प्रत्येक वर्गाने या दहीहंडीला सलामी दिली रिमझिम पावसाच्या साथीने व जुन्या नव्या संगीताच्या तालावर नाचत क्षितिजच्या गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला शेवटी प्रसादाचे वाटप होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.