क्षितिज गुरुकुल बुरुंगवाडी मध्ये रक्षाबंधन नाते प्रेमाचे हा कार्यक्रम उत्साहात साजरा

Admin

 

 सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी तालुका पलूस या विद्यालयात रक्षाबंधन हा निवासी संकुला मधील मुलांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सर्जेराव खरात सर प्रतिनिधी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुंडल लाभले होते. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री हजारे सर यांनी भूषवले प्रसंगी उपस्थित संस्थेचे संस्थापक श्री सुनील बापू जाधव कार्यवाह सौ वनिता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माननीय बी .पी जाधव सर श्री उथळे सर व लेखक राजमाने सर मुख्याध्यापिका जाधव मॅडम ,प्राचार्या पाटील मॅडम पाटील सर हेही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख मॅडम व झेंडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे खरात सरांनी सर्वांना खळखळून हसवत जुन्या पिढीमध्ये एकमेकांबद्दल असणारी ओढ व माया व्यक्त केली व क्षितिज गुरुकुल ती माया व नात्यांबद्दल चे महत्व कसं जपत आहे हेही सांगितलं यानंतर निवासी मुलांचा औक्षण कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर मुलांनी व शिक्षकांनी कराओके गाण्यांचा कार्यक्रम सादर केला यानंतर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजेच मुलांसाठी फनी गेम्स घेतल्या गेल्या त्यामधील विजेत्यांचा बक्षीस वितरण झाले व आभाराने  या कार्यक्रमाची सांगता झाली