देश भक्तीपर कार्यक्रमांनी क्षितीज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा.

Admin

 

देश भक्तीपर कार्यक्रमांनी क्षितीज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन mRlkgkr साजरा.


सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हजारवाडी गावचे माजी सरपंच रणजित यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल ( बापू) जाधव,कार्यवाह सौ.वनिता (काकी) जाधव,बाळासाहेब जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी संचलानाद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.भारताच्या नकाशाच्या आराखड्यात विद्यार्थ्यांना बसवून विविधते मधून एकता दर्शवित हम सब एक है.. चा नारा दिला


देशासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक,प्रत्येक राज्याची वैशिष्टय पूर्ण वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी गावातून भारत माता की जय, वंदे मातरम् आदी घोषणा देत गावातून भव्य अशी प्रभात फेरी काढली.लक्षवेधी अशा प्रभात फेरीचे नागरिक बंधू भगिनींनी उत्सहामय वातावरणात स्वागत केले.विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली.खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सर्व शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते