नवागतांचे स्वागत

Admin



   नवागतांचे स्वागत व विद्यार्थी  

    क्षितिज गुरुकुल मध्ये  आज नवागतांचे स्वागत व विद्यार्थी ओळख हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक आदरणीय बापू कार्यवाह सौ. काकी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजनाने झाली. बापू व काकींनी सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व मोलाचे मार्गदर्शन केले. 


या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका जाधव मॅडम, प्राचार्या.पाटील मॅडम, पी.आर.पाटील सर, व्ही. एस पाटील सर उपस्थित होते सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

 त्यानंतर विद्यार्थी ओळख करण्यात आली व बापू काकींनी मुलांना खाऊ वाटप केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिंदे मॅडम यांनी केले. भंडारे मॅडम यांनी छोट्या मुलां साठी कागदी टोप्या तयार केल्या अशा प्रकारे खूप आनंदात व उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.