संस्थेबद्दल

 संस्थेबद्दल

प्रत्येक पालकांना वाटते की माझा पाल्य हा ‘सर्वगुणसंपन्न’ असावा. त्यांचे अभ्यासामध्ये खेळामध्ये तसेच समाजामध्ये वावरताना किंवा इतर ठिकाणी त्यांच्या ‘व्यक्तिमत्वाचे’ वेगळेपण दिसून यावे हि अपेक्षा सर्वसामान्य आहे. पण हि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पालक म्हणून किती सतर्क आहोत हा प्रश्न तुम्ही कधीतरी स्वत:ला विचारला आहात का ?

         पालक म्हणून आपण फक्त आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा पूर्ततेसाठी लागणारे वातावरण निर्मिती करण्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. एकीकडे पालकांच्या अपेक्षा आणि दुसरीकडे टी व्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट, व अन्य प्रसार माध्यमे अशी हवीहवीशी वाटणारी प्रलोभन विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्या प्रलोभनांना विद्यार्थी बळी पडतात, याच्याकडे पालकांचे लक्षच नसतं. पालक फक्त विद्यार्थ्याकडून अपेक्षा धरतात आणि  त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून सर्वोतोपरी पाल्यास दोषी ठरवतात. या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या मनावर फार मोठा मानसिक ताण निर्माण होऊन विद्यार्थ्यामध्ये वाईट प्रवृत्ती बळावतात.

          या तणावातून विद्यार्थ्याना मुक्त करणे त्यांचा ‘सर्वांगीण’ विकास करणे त्यांचा ‘आत्मविश्वास’ जागृत करणे, त्यांचावर योग्य संस्कार करून नीतीमुल्यांची रुजवणूक करणे, त्याचबरोबर त्याला शारिरीक सदृढ बनविणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे “मार्कवंत विद्यार्थी बनविण्यापेक्षा गुणवंत माणूस घडविण्याचे कार्य आम्ही आरंभिले आहे”.पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान मुलांना शिकवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे हि आपली जबाबदारी आहे.

           पण आजच्या विभक्त कुटुंब पद्धती, तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि धकाधकीच्या जीवन प्रवासात हे साध्य होईलच हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणूनच आम्ही“क्षितीज गुरुकुल विद्यानिकेतन&ज्यू. कॉलेज, बुरुंगवाडी” या सर्व सोईंनीयुक्त संकुलाची निर्मिती केली आहे. आपल्या पाल्याला ज्ञान विज्ञान व संस्कृतीचे शिक्षण देऊन याचा सर्वांगीण विकास करून आत्मविश्वासपूर्वक जीवन जगण्याचे सामर्थ्य निश्चितपणे आम्ही प्राप्त करून देत आहोत ’.

आपणआमच्या शैक्षणिक संकुलास आवश्य भेट द्यावी.  आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख-लाख शुभेच्छा
आपला एक निर्णय ...  आपल्या पाल्याचे भविष्य बदलेल...