"मराठी भाषा गौरव दिन"

Admin

 "मराठी भाषा गौरव दिन"



 क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्यु कॉलेज बुरुंगवाडी 

आज क्षितिज संकुलात "मराठी भाषा गौरव दिन" उत्साहात साजरा करण्यात आला  २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ  कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला

तसेच  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख व्हावी, या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले

 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील बापू जाधव कार्यवाह सौ वनिता काकी जाधव,ब्रह्मानंद विद्यालय चे मुख्याध्यापक श्री रविराज माने सर प्राचार्य सौ एस् ए पाटील,मुख्याध्यापिका सौ डी एस जाधव, पवार सर, व्ही एस पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते