क्षितिज संकुलात "राष्ट्रीय विज्ञान दिवस " उत्साहात साजरा

Admin







क्षितिज संकुलात "राष्ट्रीय विज्ञान दिवस " उत्साहात साजरा

28 फेब्रुवारी 2026 

 क्षितिज संकुलात "राष्ट्रीय विज्ञान दिवस " उत्साहात साजरा करण्यात आला  २८  फेब्रुवारी  १९२८  साली भारताचे शास्त्रज्ञ डॉ सी.व्ही. रामन यांनी भौतिक शास्त्राच्या महत्त्वपूर्ण विषयावर शोध लावला. १९३० साली ‘रामन इफेक्ट’ या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळालं त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो  डॉ सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत होऊन विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले 

 राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून संकुलतील विद्यार्थ्याच्या बौद्धिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून  पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.