सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

Admin

सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला. 

 सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झालायाप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. सुनील बापू जाधव यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन घेण्यात आले व संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता काकी जाधव यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या पाळण्याचे  पूजन करण्यात आले. शाळेतील सहाय्यक शिक्षिका झेंडे मॅडम व सूर्यवंशी मॅडम यांनी जन्मोत्सवाचा पाळणा म्हटला त्यानंतर प्रायमरी गटातील छोट्या विद्यार्थ्यांनी नृत्यसादर केले. सौ कारंडे मॅडम यांनी कृष्ण जन्म कथा सांगितली. जमदाडे मॅडम व काळे मॅडम यांनी  गवळण व इतर कृष्ण गीते सादर केली या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकां सौ. जाधव मॅडम उपस्थित होत्या. त्याचबरोबर  प्राचार्या  सौ. पाटील मॅडम. श्री पाटील सर. श्री व्ही.एस.पाटील सर. उपस्थित होते. त्यानंतर मुलांचे थर उभा करून दहीहंडी फोडण्यात आली. 

 त्यासोबत निवासी संकुलातील विद्यार्थ्यांचासुद्धा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्याउत्साहात साजरा झाला. संस्थेच्या कार्यवाह सौ. वनिता(काकी )जाधव यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन घेण्यात आले. श्री.व्ही.एस.पाटील सरांनी श्रीफळ वाढवले  व या कार्यक्रमाची सुरुवात 
झाली.
                         प्रत्येक वर्गाने सर्वप्रथम दहीहंडीला सलामी दिली. आणि एकावर एक  मुलांचे थर उभा करून दहीहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील व स्नेहल पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार वर्षा शिंदे मॅडम यांनी मानले.